After the MNS agitation, Amazon will soon include Marathi language
महाराष्ट्र

मनसेच्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने घेतली माघार, लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार

मुंबई : मनसेने केलेल्या आंदोलनानंतर अॅमेझॉनने काहीशी माघार घेतल्याचं दिसत आहे. आज मनसे नेते आणि अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली. आज अॅमझॉनच्या अधिकाऱ्यांनी विविध प्लॅटफॉर्मवर लवकरच मराठी भाषेचा समावेश करणार असल्याचं आश्वासन दिल्याचा दावा मनसे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी सांगितलं की, अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनी मनसे नेत्यांसोबत चर्चा केली. आम्ही […]

Famous actor Anil Nedumangad drowned in a dam during filming
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा चित्रीकरणादरम्यान धरणात बुडून मृत्यू

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिल नेदुमंगड यांचा मृत्यू झाला आहे. ४८ वर्षीय अनिल केरळच्या मलंकारा धरणात आंघोळीसाठी गेले होते. धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल हे थोडुपुझा इथे आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सीन संपल्यानंतर चित्रपटाच्या टीमने ब्रेक घेतला तेव्हा अनिल आपल्या काही मित्रांसह धरणात आंघोळीसाठी गेले. याचवेळी त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडली. […]

Nilesh Rane targets Thackeray government about maratha arkshan
महाराष्ट्र

हा ठाकरे सरकारने मराठा समाजाचा केलेला अपमान, निलेश राणे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्याचा निर्णय बुधवारी (23 डिसेंबर) घेतला. त्याबाबत आता निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतीत वक्तव्य केलं आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला […]

Rupali Chakankar
पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. त्यामुळे चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शुक्रवारी 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात फोन करून तुमचे कार्यालय तोडून टाकू, जाळून […]

Cabinet approves Love Jihad bill in madhya pradesh
देश

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळात मंजुरी

मध्य प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. आता त्याला 28 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मंडळ जाईल. शनिवारी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मसुदा मंजूर झाला. यावेळी कायदा अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही कायदा आणखी कठोर केला पाहिजे, असे म्हटले आहे. उत्तर […]

A man returning from England in Pune was found to be corona positive
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील इंग्लंडमधून परतलेली व्यक्ती आढळली कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : १३ डिसेंबर रोजी इंग्लंडमधून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर अशून, कोरोनाच्या विषाणूची स्ट्रेन तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (NIV) पाठविण्यात येणार आहेत. १३ डिसेंबर रोजी ही व्यक्ती पुण्यात परतली होती. १७ तारखेला त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला […]

Toys for quality control must be marked 'ISI'
महाराष्ट्र मुंबई

गुणवत्ता नियंत्रणासाठी खेळण्यांवर ‘आयएसआय’ नमूद असणे बंधनकारक

मुंबई : केंद्र सरकारने काढलेल्या नव्या ‘खेळणी गुणवत्ता नियंत्रण’ आदेशात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या आदेशानुसार खेळण्यांवरील गुणवत्ता नियंत्रणासाठी खेळण्यांवर ‘आयएसआय’ नमूद असणे बंधनकारक करण्यात आले आहे. व्यापारावर नियमन करण्यासह सार्वजनिक आरोग्यासाठी हा आदेश काढण्यात आल्याचा केंद्र सरकारचा युक्तिवाद न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने मान्य करत त्याला स्थगितीस नकार […]

IND vs AUS 2nd Test: India's strong start, australia lose three wickets
क्रीडा

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दमदार सुरुवात

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवशी  lunch break पर्यंत ३ बाद ६५ धावा केल्या. सलामीवीर जो […]

arya rajendran will became youngest mayor and break record of devendra fadnavis
देश

21 वर्षीय तरुणीने मोडला देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरील रेकॉर्ड

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयन आहेत, तर, तिची आई एलआयसी एजंट आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

For the first time since Corona started, there is no new patient in Dharavi
महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच धारावीत एकही नवा रुग्ण नाही

कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मुंबईतली धारावी मध्यंतरी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. इथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर धारावीत कोरोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने देखील घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच […]