कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मुंबईतली धारावी मध्यंतरी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली होती. इथे मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर धारावीत कोरोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने देखील घेतली आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून आज पहिल्यांदाच मागील चोवीस तासात धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. ही निश्चितच समाधानकारक गोष्ट आहे.