भारतात कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनने बाधित एकूण सहा जण आढळले आहेत. भारत सरकारने याबाबत माहिती दिली आहे. युनायटेड किंग्डममधून परतलेल्या सहा जणांमध्ये कोरोनाचा नवीन जिनोम आढळला आहे. यापैकी तीन जणांचे नमुने बंगळुरुच्या निमहंसमध्ये, दोघांचे हैदराबादच्या सीसीएमबी आणि एकाचा नमुना पुण्याच्या एनआयव्हीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालातून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे. या सहा जणांना […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IND Vs AUS 2nd Test : भारताचा बॉक्सिंग डे कसोटीत आठ गडी राखून विजय
IND Vs AUS 2nd Test : कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत विजय नोंदवला आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण […]
मुंबईत हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, अभिनेत्रीच्या समावेशाने खळबळ
मुंबई : मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट 7 ने मुंबईच्या घाटकोपर भागातील ईस्टर्न सबर्ब परिसरातील एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून इतर तीन महिलांची सुटका केली आहे. यामध्ये एका भोजपुरी अभिनेत्रीचा देखील समावेश आहे. क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अकबर पठान यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की मोबाईलद्वारे काही […]
धक्कादायक : प्रियकराने टोकाच्या वादातून प्रेयसीला जिवंत जाळलं
नागपूर : प्रियकराने टोकाच्या वादातून विवाहित प्रेयसीला जिवंत जाळल्याच्या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. आगीत होरपळलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शबाना अब्दुल जावेद (वय ४०, रा. महेद्रनगर) असं मृत महिलेचं नाव आहे. शबाना धंतोली आदित्य मोटर्स येथे कार्यरत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा प्रियकरासोबत […]
मोठी बातमी : आंदोलनातील शेतकरी 29 डिसेंबरला सरकारला भेटायला तयार, पण..
सरकारच्या चर्चेसाठीच्या पत्रावर शनिवारी शेतकर्यांनी निर्णय घेतला आहे. त्यांनी चर्चा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारला 29 डिसेंबर ही तारीख देण्यात आली आहे. परंतु, असे म्हटले आहे की हे तीनही कृषी कायदे मागे घेण्याची शक्यता आणि किमान समर्थन किंमत (MSP)ची कायदेशीर हमी वाटाघाटीच्या अजेंड्यामध्ये असणे आवश्यक आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी ही […]
…त्यामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, चंद्रकांत पाटील यांनी दिलं अजित पवार यांना प्रत्युत्तर
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्रजी, मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे.” असं सांगितलं होतं. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला होता. आता त्यांना चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं. एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी […]
दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान घेत आहे नव्या मार्गांचा शोध
भारताविरूद्ध पाकिस्तानच्या कुरापती नेहमी सुरु असतात. दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब व्यतिरिक्त आता राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. BSF च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहे. आमचे […]
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ED ची नोटीस, स्वतः केला खुलासा
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला अंमलबजावणी संचनालयानं (ED) नोटीस पाठवल्याचा खुलासा खुलासा केला आहे. ED ची नोटीस मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मला जे फोन येत आहेत. त्यातून मोठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे. लोकांना असं वाटत आहे की सतत चौकशी करणं हा एक प्रकारचा माझावर अन्याय होत आहे, अशी प्रतिक्रिया देखील एकनाथ खडसे यांनी […]
मॉडर्नाची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अॅलर्जीचा त्रास
मॉडर्ना लसीमुळे त्रास झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. मॉडर्नाची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांना मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आली होती. करोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर मला लगेचच त्रास जाणवू लागला. मला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि ह्रदयाची धडधडही वाढली होती, असं डॉक्टर […]
एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला
पुणे : “देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार आहे,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (25 डिसेंबर) पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी टोला लगावला कि, “मी पुन्हा जाईन म्हणणाऱ्यांना पुणेकरांनी बोलावलंच कुठे होतं?” अजित पवार म्हणाले की, “एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी […]










