मुंबई : मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट 7 ने मुंबईच्या घाटकोपर भागातील ईस्टर्न सबर्ब परिसरातील एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून इतर तीन महिलांची सुटका केली आहे. यामध्ये एका भोजपुरी अभिनेत्रीचा देखील समावेश आहे.
क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अकबर पठान यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की मोबाईलद्वारे काही मुलींना वेश्या व्यवसायासाठी पुरवलं जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या टीमला या रॅकेटमध्ये मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा समावेश असल्याचं समजलं होतं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एक बोगस ग्राहकाच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला. पोलीस पुढील तपास करत असून मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.