भारतात कोरोना लसीची प्रतीक्षा आहे. आज ‘कोविशील्ड‘ या लशीला भारतात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही लस भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर केली जाऊ शकते. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीची (SEC) आज (बुधवार) कोरोना लसीवर बैठक होणार असून त्यामध्ये भारतामध्ये कोरोना लस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लशीला मान्यता मिळाली आहे. तिच्याशी संबंधित कोविशील्ड […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रिटीश सरकारकडून आणखी एका लशीच्या वापराला मान्यता, ही लस सर्व निकषांमध्ये उत्तीर्ण
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनमुळे चिंताजनक परिस्थिती ओढवलेली असली तरी आता एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटीश सरकारकडून ऑक्सफर्ड – एस्ट्राझेनेका (Oxford/AstraZeneca) लशीच्या वापराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता इंग्लंडमध्ये कोरोना रुग्णांसाठी मॉडर्नानंतर आणखी एक लस उपलब्ध झाली आहे. लवकरच देशभरात या लशीचा वापर सुरु केला जाणार आहे. ब्रिटनमधील समाजकल्याण विभागाने दिलेल्या […]
महाराष्ट्रात लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले
मुंबई : महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं, असं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे. सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या […]
सुशिक्षित बेरोजगारांसाठी भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश
महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणारे नवीन वर्ष 2021 पासून, शासकीय सेवेत सध्या 1 लाखांपेक्षा जास्त रिक्त असणाऱ्या पदांसाठी, तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरती प्रक्रिया सुरु करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मांडली आहे. विधानसभा अध्यक्ष, नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात म्हटले आहे […]
ग्रामपंचायत निवडणुक : जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज ऑनलाईनसह ऑफलाईन स्वीकारण्याचे निर्देश
मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे नागरिकांची झुंबड उडालेली आहे. जात पडताळणीच्या अर्जाचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर रोजीही राज्यातील सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी […]
ब्रेकिंग : ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढवली
भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढवण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी सहा जणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता ही संख्या वाढून २० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली असून ब्रिटनहून […]
ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये आढळला कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन
ब्रिटनहून भारतात दाखल झालेल्या प्रवाशांपैंकी अनेक जण बेपत्ता असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडलेली आहे. आत्तापर्यंत ब्रिटनहून भारतात परतलेल्या २० प्रवाशांमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. मंगळवारी ही संख्या ६ वर होती. २५ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या काळात ब्रिटनहून जवळपास ३३ हजार प्रवाशी भारतात दाखल झाल्याची माहिती आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबादच्या लॅबमध्ये […]
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात – डॉ.नीलम गोऱ्हे
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात. पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, […]
३१ डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना
मुंबई : मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात दि. २२ डिसेंबर, २०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे […]
कांद्यावरील निर्यातबंदी अखेर तीन महिन्यांनी केंद्र सरकारने उठवली
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवत देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. येत्या एक जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत विदेश व्यापार संचलनालयाने सूचना काढून कांद्याच्या निर्यातबंदी धोरणात बदल केला. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा देशातील कांदा निर्यात करता येणार आहे. कांद्याचे आवाक्याबाहेर जाणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदीच्या पाठोपाठ कांदा व्यापाऱ्यांवरदेखील निर्बंध […]










