भारतात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी वाढवण्यात आली आहे. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात ब्रिटनहून येणाऱ्या विमानसेवांवरील बंदी 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
भारतात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी सहा जणांना नव्या कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता ही संख्या वाढून २० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली असून ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर पुढील काही काळासाठी बंदी वाढवण्यात आली आहे.