मुंबई : महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडून गर्दी न करण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. सरकारने या संदर्भात सर्कुलर जारी करुन घरातच राहून नववर्षाचं स्वागत करावं, असं म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रात आधीपासूनच नाईट कर्फ्यू जारी आहे.
सर्कुलरमध्ये विशेषत: दहा वर्षांखालील मुलं आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. नियम न पाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.