IND vs AUS 2nd Test: India's strong start, australia lose three wickets

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दमदार सुरुवात

क्रीडा

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटीला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. विराटच्या गैरहजेरीत संघाचं नेतृत्त्व अंजिक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत पहिल्या दिवशी  lunch break पर्यंत ३ बाद ६५ धावा केल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सलामीवीर जो बर्न्स शून्य धावा करुन परतला. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने कॅच घेतला. मॅथ्यू वेड ३० धावा करू शकला. त्याला रविचंद्रन अश्विनने झेलबाद केले. रवींद्र जडेजाने कॅच घेतला. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने चेतेश्वर पुजाराकरवी स्टीव्ह स्मिथला झेलबाद केले. स्मिथ शून्य धावा करुन परतला. सध्या मार्नस लब्युशेन (२६ धावा) आणि त्रावीस हेड (४ धावा) खेळत आहेत.

मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने उपहारापर्यंत पहिल्या डावात ३ बाद ६५ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन तर जसप्रीत बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. विराट कोहलीच्या जागी अष्टपैलू रवींद्र जाडेजाला संधी मिळाली आहे. तर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिलला स्थान देण्यात आहे. दुखापत झाल्याने मोहम्मद शमी मालिकेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळाली आहे. या सामन्याद्वारे शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. याशिवाय भारतीय संघाने रिद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला परत बोलावलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत