मुंबई : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार असून परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळेत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत. महत्वाचे मुद्दे : विद्यार्थी असलेल्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मोठी बातमी : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास आता NIA करणार
मुंबई : गृह मंत्रालयाने मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास यापूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करत होतं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ […]
मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला तिथेच आढळला आणखी एक मृतदेह
ठाणे : मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात ज्या ठिकाणी आढळला होता, त्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंब्य्रातील खाडी किनारी भागात हा मृतदेह सापडला. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाची ओळख पटलेली असून शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल […]
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचा विमानात चढताना तीन वेळा तोल गेला, व्हिडिओ होतोय व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन शुक्रवारी एअरफोर्स वन या विमानात चढताना पायऱ्यांवरून तीन वेळा घसरले. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. एअरफोर्स वनमध्ये चढताना बायडन पायऱ्यांवरून घसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अटलांटा येथे या आठवड्याच्या सुरुवातीला सामूहिक गोळीबार झाला. याबाबत आशिया-अमेरिकन समुदायाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी बायडन यांना या विमानातून अटलांटा येथे जायचं […]
ब्रेकिंग : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घारडा केमिकल कंपनीत स्फोट, तीन कामगार ठार
रत्नागिरी : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी मधील घारडा केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या कंपनीच्या ७ नंबरच्या प्लांटमध्ये २ स्फोट झाल्याची माहिती मिळत असून या स्फोटानंतर कंपनीला आग लागली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या […]
IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक सामना
IND vs ENG 5th T20 : आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेतील निर्णायक आणि अखेरचा सामना खेळला जाणार आहे. चौथ्या टी -20 सामन्यात भारताच्या रोमहर्षक विजयानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून ही सिरीज जिंकण्याचे प्रयत्न दोन्ही संघांकडून केले जाणार आहेत. हा सामना संध्याकाळी ७ वाजता […]
अँटिलीया स्फोटक प्रकरणी घटनेचे नाट्यरुपांतर, सचिन वाझे यांना मोठा कुर्ता घालून चालायला लावलं
मुंबई : अँटिलीया स्फोटक प्रकरणी NIA सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर या घटनेचे नाट्यरुपांतर देखील करण्यात आले आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते. स्फोटकं ठेवल्यानंतर पीपीई किट सदृष्य मोठ्या आकाराचा कुर्ता घालून एक व्यक्ती स्कॉर्पिओतून मागील […]
‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण
मुंबई : ‘बिग बॉस 14’ शोची बहुचर्चित स्पर्धक निक्की तांबोळी हिला कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिने स्वत:ला विलगीकरणात ठेवल्याचे तिने सांगितले आहे. निक्कीने म्हटलं की, ‘आज सकाळी मला कळले की, माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वत:ला विलगीकरणात ठेवलेले आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व नियमांचे पालन […]
धक्कादायक : नागपुरात बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह
नागपूर : सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एएसआय नरेंद्र बघेल या पोलीस अधिकार्याच्या मुलाचा मृतदेह मॉलमध्ये आढळून आला असल्याची माहिती मिळाली आहे. फॉर्च्युन मॉल गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे या प्रकरणात गूढ निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाने २०१६ मध्ये […]
राज्य सरकारने जारी केल्या कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स, दिल्या ‘या’ सूचना
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. काल राज्यात सर्वाधिक २५ हजार नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळं सरकारकडून हॉटेल व मंगल कार्यालयांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर आज सरकारने नव्यानं गाईडलाईन्स जारी करत खासगी […]










