नवी दिल्ली : लैंगिक छळ केलेल्या एका आरोपीला पीडित मुलीकडून राखी बांधून घेण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्याचा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्दबातल केला आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने अशा प्रकरणांची गंभीर दखल घेत त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही (Supreme Court Guidelines) जारी केल्या आहेत. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये महिलांविरूद्ध रुढीवादी भूमिका टाळण्याचा सल्ला सर्वोच्च […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग : इंग्लंडविरुद्धच्या वन डे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा
इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचे तिन्ही सामने पुण्यात खेळले जातील. या संघात सूर्यकुमार यादव, क्रुणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांना स्थान मिळालं आहे. भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका वेळापत्रक : 23 मार्च – दुपारी 1:30 वाजता – पुणे 26 मार्च – दुपारी 1:30 […]
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, कोरोना रुग्णसंख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला असून राज्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात यापूर्वी १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. मात्र, काल (गुरूवार) कोरोना रुग्णसंख्येचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहे. काल राज्यात २५ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना […]
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांंना करोनाची लागण
जळगाव : ठाकरे सरकारमधील २५ हून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे आता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैनंदिन कामकाजामुळं होणारा प्रवास आणि लोकांशी येणारा संपर्क यामुळं लोकप्रतिनिधींना संसर्गाचा धोका अधिक आहे. सरकारमधील […]
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे दिलासा, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन महागाईत इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. खरंतर, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या दरांमुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. पण विशेष म्हणजे सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल […]
आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं होणार खूप अवघड, जाणून घ्या…
नवी दिल्ली : रस्त्यावरुन जाताना आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेचा विचार करून, सरकारकडून आता ड्रायव्हिंग लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत बदल केले जाणार आहेत. नवीन नियमांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स देण्यापूर्वी अर्जदारास व्हिडिओ ट्यूटोरियल दाखविला जाईल. ड्रायव्हिंग चाचणीच्या एक महिन्यापूर्वी दाखविलेल्या या व्हिडिओ ट्यूटोरियलमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंगशी संबंधित माहिती दिली जाईल. या व्यतिरिक्त, अपघातग्रस्तांच्या कुटूंबाबरोबर चर्चा देखील करावी लागेल, जेणेकरून रस्त्यावरुन […]
‘चेहरे’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रिया चक्रवर्ती दिसली, पण…
मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचा ट्रेलर आज (18 मार्च) प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बर्याच दिवसांपासून चर्चेचा भाग बनला आहे. ‘चेहरे’च्या टीझर्स आणि पोस्टर्समधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती गायब झाल्यानंतर तिला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा सर्वत्र केली जात होती. पण, ट्रेलरमध्ये रिया दिसत आहे. 2 मिनिट 22 […]
नितीन गडकरींची मोठी घोषणा, टोल बाबत सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, येत्या एक वर्षात सर्व टोलनाके हटवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जितका ते रस्त्याचा वापर करतील. अमरोहा येथील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वरजवळील रस्त्यावर नगरपालिका […]
केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की… बाळ सध्या व्हेंटिलेटरवर
हरियाणा मधील गुरुग्राम येथे सेक्टर-56 मधील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये एका महिलेला आपल्या १३ महिन्यांच्या बाळाला केअरटेकर कडे ठेवणं खूपच महागात पडलं आहे. 15 वर्षांच्या या अल्पवयीन केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की बाळाच्या चार बरगड्यांची हाडे मोडली. याव्यतिरिक्त बाळाला किडनी, यकृत आणि इतर अवयवांवर देखील दुखापत झाली आहे. हे बाळ सध्या व्हेंटिलेटरवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे […]
RBI ची परीक्षा देण्यासाठी पहिल्यांदाच मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं आहे. मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले. RBI ने नुकतीच ८४१ हजेरीसहायक पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यापैकी मुंबई […]










