भारतीय कुस्तीपटू बबिता फोगट आणि गीता फोगट यांची चुलत बहिण रितिका फोगटने आत्महत्या केली. रितिका १७ वर्षांची होती. भरतपूर येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत झालेल्या पराभवामुळे खचून रितिकाने आत्महत्या केली. आमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटामुळे फोगट कुटुंब प्रसिद्धीस आलं. रितिकादेखील दंगल गर्ल गीता फोगटच्या कुटुंबाचा भाग होती. रितिकाने द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग फोगट यांच्याकडून प्रशिक्षण […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असलेल्या उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रियाने सोशल मीडियावर त्यांना दोघांनाही कोरोना झाल्याचं सांगितलं आहे. प्रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर ही बातमी सगळ्यांसोबत शेअर केली. ती म्हणाली कि, “दुर्देवाने उमेश आणि माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघेही घरातच विलगीकरणात आहोत. डॉक्टरांनी दिलेली सगळी […]
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश दिले […]
मुलाने कानशिलात लगावल्याने वृद्ध आईचा जागेवर मृत्यू , व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली : दिल्लीत द्वारका परिसरात रागाच्या भरात मुलाने आपल्या वयोवृद्ध आईच्या कानशिलात लगावली. त्यामुळे वृद्ध आईचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना CCTV मध्ये रेकॉर्ड झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास बिंदापूर पोलीस ठाण्यात एक फोन आला. […]
पत्रकारावर लाईव्ह कार्यक्रमात पडला मोठा टीव्ही सेट, व्हिडिओ व्हायरल
कोलंबियामधून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. इथे लाईव्ह कार्यक्रमात स्टुडिओमधील एका पत्रकारावर एक मोठा टीव्ही सेट पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने त्या पत्रकाराला जास्त दुखापत झालेली नाही. ही घटना टीव्ही चॅनल ईएसपीएन कोलंबियामध्ये काम करणारे पत्रकार कार्लोस ऑर्डुज यांच्याबरोबर घडली आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान […]
ब्रेकिंग : भारतीय वायुसेनेचे मिग -21 बाइसन विमान दुर्घटनाग्रस्त, ग्रुप कॅप्टनचा मृत्यू
भारतीय वायुसेनेचे मिग -21 बाइसन विमान कोसळले. या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला आहे. लढाऊ प्रशिक्षण अभियानासाठी हे विमान मध्य भारतातील एअरबेसवरून रवाना झाले होते. भारतीय वायुसेनेने ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबियांसोबत दृढपणे उभे असल्याचं सांगितलं आहे. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीला आदेश […]
मोठा खुलासा : अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच..
अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं NIA नं स्पष्ट केलं आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या, या प्रकरणी एनआयए तपास करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अँटिलियाबाहेर एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE […]
11 वर्षीय नातीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा
यवतमाळ : आजोबाने 11 वर्षीय नातीवरच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घाटंजी तालुक्यात घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 (पोक्सो) प्रमाणे आरोपी आजोबाला सक्तमजुरीसह आमरण जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. ती लहान बहिणीसह वडिलांसोबत राहत होती. तिचे आजोबा मारेगाव तालुक्यातील एका गावात राहत होते. उन्हाळ्याच्या […]
बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात झाला बाळाचा जन्म
बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मुलीचा जन्म झाला. बोर्डवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. तसेच जयपूर विमानतळावर तात्काळ याबाबत सूचना देऊन तिथे डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले. महिलेला त्रास सुरु झाल्यानंतर तात्काळ मदतीसाठी हालचाली करण्यात आल्या. लगेचच सर्व व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, प्रसूती करण्यात डॉ. सुभाना नजीर यांनी मदत […]
देशांतर्गत होणाऱ्या सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द, बीसीसीआयची घोषणा
मुंबई : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआयने देशांतर्गत होणाऱ्या सर्व वयोगटांच्या क्रिकेट स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आयपीएल २०२१ प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यापासून म्हणजेच १६ मार्च पासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे आंतरराष्ट्रीय सामने सुरू […]










