अहमदनगर : माजी केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गांधी यांचं आज कोरोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दिल्लीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपासून ते दिल्लीतच राहत होते. त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी करून घेतली […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग : भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू
हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे निवासस्थान दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळ आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप शर्मा यांनी स्वत: च्या खोलीत गळफास घेतला. दरवाजा […]
क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याच्या नादात तरुणी अडकली खिडकीच्या गजांमध्ये…
पुणे : पुण्यात एका 18 वर्षीय तरुणीला क्वारंटाइन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणं चांगलंच महागात पडलं. ही मुलगी खिडकीतून पळून जाण्याचा विचार करत होती. मात्र खिडकीतुन बाहेर निघताना ती खिडकीच्या गजांमध्ये अडकून बसली. तिला तेथून आत जाता येत नव्हतं आणि बाहेरही येता येत नव्हतं. पुणे शहरातील एरंडवणे भागातील बमहीला सेवा मंडळाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये रात्री साडे […]
धक्कादायक : महिलेने बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्यामुळे तरुणाची आत्महत्या
नवी दिल्ली : एका 41 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून त्या व्यक्तीची सुसाइड नोट मिळाली आहे. त्यात या व्यक्तीने लिहिले आहे की एका महिलेने आणि तिच्या वडिलांनी त्याच्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मृताच्या आईने तक्रार केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू […]
पुण्यात कॅम्प परिसरातील मार्केटला भीषण आग, २५ दुकाने जळून खाक
पुणे : कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केटला पहाटे पावणे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत मार्केटमधील मासे आणि चिकनची अंदाजे २५ दुकाने पूर्णपणे जळाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाच्या आठ गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या ब्रिटिश कालीन […]
सचिन वाझे यांची प्रकृती अचानक बिघडली; जेजे रुग्णालयात दाखल
सोमवारी सचिन वाझे यांची प्रकृती अचानक बिघडली. ते एनआयएच्या ताब्यात आहेत. छातीत दुखायला लागल्यानंतर वाझे यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंबानी यांच्या निवासस्थान अँटिलियाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पियो आणि त्याचा मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ, पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित सचिन वाझे यांना […]
जसप्रीत बुमराहची संजना गणेशनने घेतली विकेट, अडकले विवाहबंधनात
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन यांनी सोमवारी (15 मार्च) गोव्यात एका अतिशय खाजगी कार्यक्रमात लग्न केले. लग्नामध्ये या दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र सहभागी होते. बुमराहने स्वतः ट्विटरवर फोटो शेयर करत याबद्दल माहिती दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटीच्या शेवटच्या सामन्यापूर्वी बुमराहने संघातून आपले नाव मागे घेतले. लग्नाच्या तयारीसाठी […]
राज्यात राजकीय घडामोडींना वेग, शिवसेना – राष्ट्रवादीत चर्चा की वाद?
सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर महाविकास आघाडीमध्येही ठिणगी पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विरोधकांनी विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली […]
भयंकर : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
ऑस्ट्रेलिया : स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान पॅराशूट न उघडल्यामुळे एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. तथापि, हा तरुण खूपच अनुभवी स्कायडायव्हर होता. रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पर्थच्या उत्तरेकडील ज्युरियन बे येथे व्हर्च्युअल नॅशनल स्कायडायव्हिंग स्पर्धेदरम्यान हा अपघात झाला. वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील ज्युरियन बे येथे स्कायडायव्हिंग स्पर्धेत एका तरुणाने सहभाग घेतला होता. सोलो विंगसूट परफॉर्म करताना त्याने […]
मोठी बातमी : सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ, पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित
मुंबई : सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA नं शनिवारी रात्री वाझे यांना अटक केली. त्यांच्याविरोधात NIA कडे भक्कम पुरावे असल्याची चर्चा आहे. आता वाझेंचं पुन्हा एकदा पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. पहिल्यांदा […]









