नवऱ्याला घाबरवण्यासाठी गळफास घेण्याचे नाटक करताना एका महिलेचा मृत्यू झाला. झारखंडमधील धनबादमध्ये रामकनाली फिल्टर प्लान्टच्या जवळच ही धक्कादायक घटना घडली. महिलेच्या आठ वर्षीय मुलीने सांगितले की तिची आई गळफास घेण्याचे नाटक करत होती. गळफास घेतानाचा फोटो काढत असताना स्टुलावरून तिचा पाय घसरला. त्यामुळे, फास आवळून तिचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. मनोज महतोचे हे दुसरे लग्न […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पॅन कार्ड बनवता येणार अवघ्या 10 मिनिटांत, जाणून घ्या…
आजकाल प्रत्येकाकडे पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे. अनेक महत्त्वपूर्ण सेवा मिळवण्यासाठी पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता पॅनकार्ड मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारचा आयटी विभाग वेळोवेळी प्रयत्न करत असतो. आता तर आपल्याला पॅन कार्ड अवघ्या 10 मिनिटांत मिळू शकते. आता पॅन कार्ड साठी अर्ज भरण्याची किंवा त्यावर प्रक्रिया […]
ब्रेकिंग : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तामिळनाडू आणि केरळ सरकारच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याचे आवाहन
पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. मात्र, कोर्टात तामिळनाडू आणि केरळ सरकारच्या वतीने सुनावणी पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केरळ-तामिळनाडू सरकारचे म्हणणे आहे की निवडणुकांचे वातावरण असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात यावी. कारण हा पॉलिसीशी संबंधित निर्णय आहे. अशा परिस्थितीत सरकार सध्या कुठलीही बाजू घेऊ शकत नाही. […]
प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, पण..
इंडिगोच्या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानाची नागपूरच्या बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. हे विमान शनिवारी (दि.१३) चेन्नईहून दिल्लीकडे निघाले होते. परंतु मेडिकल इमर्जन्सीमुळे विमान अचानक नागपूरमध्ये उतरवण्यात आलं. मात्र, तरीदेखील दुर्दैवाने या प्रवाशाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईहून दिल्लीकडे निघालेल्या या विमानात छोटूसिंह नारायण (६५) हे प्रवास करत होते. विमानाने दिल्लीसाठी […]
ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाच नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दलच्या अहवालानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतीत अनेक वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही, त्याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणजेच नंदीग्राममध्ये ममता यांच्या पायाला झालेली जखम हा एक अपघात होता. ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने […]
…तर महाराष्ट्र सरकार कोसळेल, सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत हिने सचिन वाझे अटक प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने या प्रकरणावरून शिवसेना आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन वाझे अटक प्रकरणाचा योग्य तपास केला तर सत्य बाहेर येईल आणि शिवसेनेचं सरकार कोसळेल, असं तिने ट्विट करत म्हटलं आहे. कंगना रनौतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “या प्रकरणात एक मोठं कारस्थान […]
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला कोरोनाची लागण
मुंबई : मागील काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्यातच आता आणखी एका अभिनेत्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सिद्धांतने स्वतःच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सिद्धांत मागील महिन्यात इशान खट्टर आणि कॅटरिना कैफ यांच्यासोबत ‘फोन भूत’ या चित्रपटाचं […]
हे राज्य सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, संजय राऊत यांनी व्यक्त केली भीती
मुंबई : सचिन वाझे यांच्यावरील कारवाईनंतर राजकारणात देखील त्याचे पडसाद उमटत आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ‘हिरेन प्रकरणातील गुप्त माहिती सगळ्यात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिळाली, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत,’ असंदेखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. […]
सचिन वाझे यांना NIA कडून अटक
मुंबई : सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी NIA कडून सचिन वाझे यांची शनिवारी कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सकाळी ११.३० वाजल्यापासून तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर त्यांना रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी अटक करण्यात आली. NIA ने […]
दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसला आग, सर्व प्रवासी सुखरुप
दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या दिल्ली-देहरादून शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग लागली. कांसरो स्थानकाजवळ ही घटना घडली आहे. ज्या डब्यात आग लागली त्या कोचला वेगळं करण्यात आलं. सर्व प्रवासी सुरक्षित असून शताब्दी एक्स्प्रेस देहरादून स्थानकात दाखल झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच कांसरो रेंजमधील रेंजर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बचावकार्य […]










