आजकाल प्रत्येकाकडे पॅन कार्ड असणे आवश्यक झाले आहे. अनेक महत्त्वपूर्ण सेवा मिळवण्यासाठी पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक असते. या सर्व गोष्टी लक्षात घेता पॅनकार्ड मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारचा आयटी विभाग वेळोवेळी प्रयत्न करत असतो. आता तर आपल्याला पॅन कार्ड अवघ्या 10 मिनिटांत मिळू शकते.
आता पॅन कार्ड साठी अर्ज भरण्याची किंवा त्यावर प्रक्रिया होण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. पॅन कार्ड अवघ्या 10 मिनिटांत पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केले जाऊ शकते. ज्यांच्याकडे आधार नंबर आहे त्यांच्यासाठी भारत सरकारच्या आयटी विभागाने ही सुविधा सुरू केली आहे. इन्स्टंट पॅन कार्ड कसे मिळवायचे ते आपण जाणून घेऊ.
अशाप्रकारे त्वरित ऑनलाइन पॅन कार्ड मिळवा :
- ई-फाइलिंग पोर्टल https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-PAN/ वर जा.
- ‘Ínstant PAN through Aadhaar’ वर क्लिक करा.
- आता ‘Get New PAN’ पर्याय निवडा.
- आपला आधार कार्ड क्रमांक टाका.
- नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल.
- हा ओटीपी तिथे प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला ई-पॅन देण्यात येईल.
अशा प्रकारे ई-पॅन कोणत्याही अडचणीशिवाय डाउनलोड करता येईल. ही प्रक्रिया विनाशुल्क आहे. त्याची स्वयं-प्रमाणित प्रिंट पूर्णपणे वैध आहे. पॅन कार्ड NSDL आणि UTITSL द्वारे देखील मिळू शकते, परंतु त्यांच्या सेवा मिळविण्यासाठी काही शुल्क भरावे लागेल. ही पद्धत सोपी आहे आणि इन्स्टंट पॅन सुविधा अंतर्गत आधार कार्डद्वारे ई-पॅन कार्ड मिळवण्यासाठी फक्त 10 मिनिटे लागतात.
पॅनशी आधार लिंक असणे फार महत्वाचे आहे. त्याशिवाय आयटी रिटर्न भरता येत नाही. बँकिंग व्यवहारांत देखील अडचणी येऊ शकतात. तसेच ज्या लोकांकडे पॅन कार्ड नाही, त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.




