Actress Tara Sutaria infected with corona
मनोरंजन

अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण

मुंबई : अभिनेत्री तारा सुतारियाला कोरोनाची लागण झाली आहे. तारा सुतारियालाही कोरोनाची लागण झाली आहे. फिल्मफेयरने दिलेल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. तारा सुतारियाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तारा सुतारियाने काही दिवसांपूर्वी आपला आगामी चित्रपट तडपची शूटिंग पूर्ण केली. या चित्रपटात तारासोबत अहान शेट्टी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 24 सप्टेंबर […]

Rekha Jare's murder case: District Sessions Court rejects Bal Bothe's pre-arrest bail
अहिल्यानगर महाराष्ट्र

बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक, बोठे राहत असलेल्या रूमला होतं बाहेरून कुलूप

अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात नगर पोलिसांना यश आलं आहे. ज्या रूम मध्ये बाळ बोठे होता त्या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. तरीदेखील पोलिसांनी बाळ बोठेला जेरबंद केलं आहे. बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी […]

Strict action will take if corona rules are not followed during air travel
कोरोना देश

हवाई प्रवासादरम्यान कोरोना नियमांचं पालन न करणं महागात पडणार, डीजीसीए ने दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियम योग्य पद्धतीने ना पाळल्यास डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. डीजीसीएकडून  यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. विमानतळावर दाखल झाल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा लागेल. तसेच प्रवासादरम्यान […]

Actor Manoj Bajpayee infected with corona
मनोरंजन

अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण

अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मनोज वाजपेयी सध्या त्यांच्या घरीच विलगीकरणात आहेत. दरम्यान, यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीमच्या वतीनेही यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की मनोज सध्या despatch या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते, या चित्रपटाचे निर्माता […]

Husband brutally murdered after showing pornographic videos
नागपूर महाराष्ट्र

भयंकर : अश्लील चित्रफीत दाखवून बेसावध करत पतीची निर्घृण हत्या, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

नागपूर : नागपूरमध्ये एका महिलेने तिच्या नवऱ्याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने तिच्या नवऱ्याला अश्लील चित्रफीत दाखवून त्याचे हात खुर्चीला बांधले आणि नंतर त्याच्या गळ्यावरून चाकू फिरवत त्याचा खून केला. लक्ष्मण मलिक (वय ६५) यांच्या हत्येचा उलगडा करीत गुन्हेशाखा पोलिसांनी याप्रकरणी मारेकरी पत्नीला अटक केली आहे. स्वाती लक्ष्मण मलिक (वय ३१) […]

MPSC exam
महाराष्ट्र

ब्रेकिंग : MPSC ची परीक्षा आता होणार २१ मार्चला, लोकसेवा आयोगाचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रविवार २१ मार्च रोजी होणार आहे. आयोगाने संकेतस्थळावर यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहे. उमेदवारांना १४ मार्च २०२१ च्या परीक्षेसाठी जी प्रवेशपत्रे जारी केली होती, त्याच प्रवेशपत्रांच्या आधारे २१ मार्चच्या परीक्षेला प्रवेश देण्यात येणार आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० शनिवारी २७ मार्च रोजी आयोजित […]

Decision to reduce syllabus so that students do not become stressed
महाराष्ट्र शैक्षणिक

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा यांनी दहावी-बारावी बोर्ड परिक्षेबाबत बैठक घेतली. या बैठकीत पालक संघटना, शिक्षक तसेच बोर्ड आणि शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी बोर्ड परिक्षेबाबत पालक, शिक्षकांचे म्हणणे जाणून घेतले. बोर्ड परीक्षांबाबत सर्व बाजूने चर्चा करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पालकांच्या शंकांचे निरसन केले. पालकांनी परीक्षा ऑनलाइन घेता येईल का ? हा […]

Gopichand Padalkar arrested in MPSC agitation
पुणे महाराष्ट्र

MPSC आंदोलन प्रकरणात गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना अटक

पुणे : MPSC ची नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यावर पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. यावेळी आंदोलनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची धरपकड केली […]

mpsc exam date will be announced tomorrow says cm Uddhav Thackeray
महाराष्ट्र मुंबई

MPSC ची परीक्षा येत्या आठवड्याभरातच घेतली जाणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : MPSC ची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यानंतर आता सरकारने ही परीक्षा येत्या आठवड्याभरात घेतली जाणार असल्याचं सांगितलं. काही दिवसांसाठी एमपीएससीची 14 मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव […]

MPSC exam
काम-धंदा महाराष्ट्र

मोठी बातमी : MPSC परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या रविवारी १४ मार्च २०२१ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशांनंतर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची सुधारित तारीख नंतर जाहीर करण्यात […]