Actor Manoj Bajpayee infected with corona
मनोरंजन

अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण

अभिनेता मनोज बाजपेयी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. मनोज वाजपेयी सध्या त्यांच्या घरीच विलगीकरणात आहेत. दरम्यान, यामुळे त्यांच्या आगामी चित्रपटाचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चित्रपटाच्या टीमच्या वतीनेही यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की मनोज सध्या despatch या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते, या चित्रपटाचे निर्माता रॉनी स्क्रूवाला आहेत. मनोज यांनी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे आणि ते सर्व खबरदारी घेत आहेत. ते लवकरच बरे होतील, अशी अपेक्षा आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत