मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितले की ते त्यांचा मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून कायम राहतील.
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे दुसरे लग्नही मोडले आहे. आमिर खान आणि किरण राव हे दोघे परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहे. 28 डिसेंबर 2005 रोजी या दोघांचे लग्न झाले. या दोघांनीही पंधरा वर्षानंतर ते घटस्फोट घेत असल्याचे सांगून सर्वांना चकित केले आहे. आमिर आणि किरण यांनीही घटस्फोटाबाबत अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे.
दोघांनी लिहिले, ‘आम्ही एकत्र 15 वर्षे व्यतीत केली, आम्ही प्रत्येक क्षण आनंदाने जगत होतो आणि आमच्या नात्यात विश्वास, आदर आणि प्रेम वाढतच गेले. आता आपण आपल्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू करू, यापुढे आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाही. परंतु आम्ही मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून राहू. आम्ही काही काळापूर्वी आमच्या विभाजनाची योजना आखली होती आणि आता आम्ही स्वतंत्र राहण्याची सोय करतो आहोत. आम्ही मुलगा आझादचे सह-पालक म्हणून राहू आणि एकत्र त्याची काळजी घेऊ. आम्ही चित्रपटांसाठी आणि आपल्या पानी फाऊंडेशनसाठी एकत्र काम करत राहू.
ते पुढे म्हणाले कि, “आमच्या नातेसंबंधाबद्दल नेहमी समजून घेतल्याबद्दल आमच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे आभार. हा घटस्फोट शेवट नसून एका नवीन प्रवासाच्या प्रारंभाच्या रुपात दिसेल. धन्यवाद आणि प्रेम, किरण आणि आमिर.”




