हिमाचल प्रदेशातील मंडी येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांचे निवासस्थान दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयाजवळ आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामस्वरूप शर्मा यांनी स्वत: च्या खोलीत गळफास घेतला. दरवाजा आतून बंद होता. त्यांच्या एका कर्मचार्याने पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा तोडला. रामस्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर आज होणारी भाजपा संसदीय पक्षाची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे.




