A baby girl was born on board an IndiGo flight from Bengaluru to Jaipur
देश

बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात झाला बाळाचा जन्म

बेंगळुरूहून जयपूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका मुलीचा जन्म झाला. बोर्डवरील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने या महिलेची प्रसूती करण्यात आली. तसेच जयपूर विमानतळावर तात्काळ याबाबत सूचना देऊन तिथे डॉक्टर आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महिलेला त्रास सुरु झाल्यानंतर तात्काळ मदतीसाठी हालचाली करण्यात आल्या. लगेचच सर्व व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, प्रसूती करण्यात डॉ. सुभाना नजीर यांनी मदत केली. तसेच विमानातील कर्मचार्‍यांनी हे सर्व योग्य प्रकारे हाताळलं आणि या महिलेची प्रसूती व्यवस्थित झाली. आई आणि बाळ दोघेही व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत