person appear on CCTV outside Antilia is Sachin Vaze
महाराष्ट्र मुंबई

मोठा खुलासा : अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच..

अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं NIA नं स्पष्ट केलं आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या, या प्रकरणी एनआयए तपास करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं बोललं जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, अँटिलियाबाहेर एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE किट घालून अँटिलियाच्या बाहेरून जात असल्याचं दिसत आहे. मात्र, हे पीपीई किट नसून मोठा कुर्ता-पायजमा असल्याचं एनआयएनं स्पष्ट केलं आहे. तसेच, ते सचिन वाझेच असून त्यांनी ओळख लपवण्यासाठी मोठ्या हातरुमालाने चेहरा आणि डोकं झाकलं होतं, आणि मोठ्या आकाराचा कुर्ता-पायजमा घातल्याचं देखील एनआयएनं सांगितलं आहे.

दरम्यान, एनआयएनं सचिन वाझे यांच्या कार्यालयातून लॅपटॉप जप्त केला. मात्र, त्यातील सर्व डाटा आधीच डिलीट केलेला आहे. तसेच, सचिन वाझे यांनी त्यांचा मोबाईल फोन हरवल्याचं सांगितलं. एनआयएनं एक मर्सिडिज कार देखील ताब्यात घेतली असून त्याचा तपास सध्या सुरू आहे. या कारमध्ये एनआयएला कॅश आणि नोटा मोजण्याचं मशिन सापडलं आहे. ही कार सचिन वाझे यांनी वापरली असल्याचा संशय आहे. मात्र या कारसोबत काही भाजपा पदाधिकाऱ्यांचे फोटो सापडल्याचं बोललं जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत