बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांच्या लहान भावाचं अस्लम खान यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या एहसान खान (९० वर्ष) आणि अस्लम खान(८८ वर्ष) या दोन्ही भावांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अस्लम खान यांचं अखेर निधन झालं आहे. अस्लम खान यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधीत काही समस्यादेखील होत्या, असं सांगण्यात येत आहे.




