अँटिलियाबाहेर सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच असल्याचं NIA नं स्पष्ट केलं आहे. अँटिलियाच्या बाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या कुणी ठेवल्या, या प्रकरणी एनआयए तपास करत असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, अँटिलियाबाहेर एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती PPE […]

