मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
बिग ब्रेकिंग! पेट्रोल डिझेल होणार स्वस्त, गॅस सिलेंडरवर मिळणार अनुदान, केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये […]
पुणे : भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक
पुणे : भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणारा (पल्टीसिलेंडर) आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार ज्ञानदेव चांदगुडे असे या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार गॅस सिलेंडर मधील गॅस चोरुन काढुन काळाबाजार करणाऱ्या आरोपींचा गुप्तपणे शोध घेत होते, यावेळी खबऱ्याकडून त्यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती श्री. […]
पुणे : गावठी दारू अड्डयावर पोलिसांकडून छापा, 998.5 लिटर हातभट्टीची दारु जप्त
पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारू अड्डयावर छापा टाकत तीन आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. सदर आरोपींकडून 39,850 रुपये किंमतीची 998.5 लिटर गावठी हातभट्टीची दारु व रोख रक्कम 830 रुपये असा एकूण 40,680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांना 19 मे रोजी माहिती मिळाली की बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील […]
औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या, एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार देवगिरी महाविद्यालयाजवळ आज दुपारी घडली. आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची 3 पथके असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर […]
चंद्रपूर अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून पाच लाखांची आर्थिक मदत
मुंबई : चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. अजयपूर गावाजवळ काल रात्री पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये अपघातानंतर मोठी आग लागून ट्रकमधील नऊ मजुरांचा भाजून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आर्थिक […]
ब्रेकिंग! माजी कबड्डीपटू उदय चौटा यांचे निधन
मंगळुरू : भारतीय कबड्डी संघाचे माजी सदस्य आणि एकलव्य पुरस्कार प्राप्त करणारे दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पहिले कबड्डीपटू उदय चौटा यांचे शनिवारी पहाटे (21 मे) निधन झाले. ते ४३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर मंगळुरू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दशकांच्या क्रीडा कारकिर्दीत, उदय यांनी 100 हून […]
पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या, मीडियाने व्यक्त केला संताप
पाटणा : बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात एका पत्रकाराची काही हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. सांखो गावात ही घटना घडली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच पत्रकाराचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. मृत पत्रकार सुभाष कुमार हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. या घटनेबाबत पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी संध्याकाळी […]
ऋतू बदलताना काळजी घ्या, आजारपण टाळण्यासाठी काय करावे जाणून घ्या…
पुणे : सध्या उष्णता कमी होत असून पावसाचे वातावरण तयार होत आहे. जसजसे हवामान गरम किंवा थंड होत जाते, तसतसे आपण त्यादृष्टीने आपल्या खाण्याच्या सवयी, व्यायाम, दिनचर्या आणि जीवनशैली समायोजित करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण वर्षभर निरोगी राहू शकू. कडाक्याच्या उन्हाळा काही प्रमाणात कमी झाला असून पावसाळा जवळ येत असल्याने उष्णता काहीशी कमी जाणवत आहे. […]
यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गावर सुरक्षा भिंत कोसळल्याने 10 हजार लोक अडकल्याची माहिती
उत्तराखंड : यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे 10,000 लोक अडकले असल्याची माहिती आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गालगत विविध ठिकाणी 10 हजार लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी 3 दिवस लागू शकतात. जिल्हा प्रशासन काही छोट्या वाहनांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र […]










