Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical

पुणे : गावठी दारू अड्डयावर पोलिसांकडून छापा, 998.5 लिटर हातभट्टीची दारु जप्त

पुणे महाराष्ट्र

पुणे : सामाजिक सुरक्षा विभागाने बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारू अड्डयावर छापा टाकत तीन आरोपींविरुद्ध कारवाई केली आहे. सदर आरोपींकडून 39,850 रुपये किंमतीची 998.5 लिटर गावठी हातभट्टीची दारु व रोख रक्कम 830 रुपये असा एकूण 40,680 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांना 19 मे रोजी माहिती मिळाली की बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील आण्णाभाऊ साठे नगर, अप्पर कोंढवा रोड, झांबरे वस्ती, बिबवेवाडी, पुणे याठिकाणी विक्रीसाठी गावठी दारूचा साठा करून ठेवला आहे. त्यानुसार पोलीस पथकाने पंचासह, त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास छापा टाकला. या ठिकाणी ३ जणांच्या ताब्यात सुमारे 39,850 रुपये किंमतीची 998.5 लिटर गावठी हातभट्टीची दारु व रोख रक्कम 830 रुपये असा एकूण 40,680 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळला. याबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे कलम 65 ई महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा अन्वये नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणात अटक / कारवाई केलेल्या आरोपींची नावे :

  1. शारदा किसन सोनावणे, वय 60 वर्षे (महिला आरोपीस दिनांक 20 मे रोजी तपासासाठी हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.)
  2. अनिल यशवंत गुप्ते, वय 28 वर्षे, (अटक)
  3. विजय सिताराम कट्टीमनी वय 24 वर्षे (अटक)
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत