lpg gas cylinder price commercial cylinder price hike
पुणे महाराष्ट्र

पुणे : भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक

पुणे : भरलेल्या गॅससिलेंडर मधील गॅस चोरी करणारा (पल्टीसिलेंडर) आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार ज्ञानदेव चांदगुडे असे या आरोपीचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 17 मे रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार गॅस सिलेंडर मधील गॅस चोरुन काढुन काळाबाजार करणाऱ्या आरोपींचा गुप्तपणे शोध घेत होते, यावेळी खबऱ्याकडून त्यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती श्री. गुरुसिंग गुरुद्वारा पार्कींग, दारुवाला पुल, पुणे येथे टेम्पो मधुन भरलेल्या गॅस सिलेंडरमधील गॅस रिकाम्या सिलेंडर मध्ये नळीद्वारे अनधिकृतरित्या (पल्टी सिलेंडर) भरत आहे. लोकांच्या जिवितास व मालमत्तेस धोका निर्माण होईल, असे कृत्य करुन त्या गॅससिलेंडरच्या विक्रीकरता गॅसचा काळाबाजार करत आहे.

ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकुन तेथे हजर असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव तुषार ज्ञानदेव चांदगुडे (वय 27 वर्षे, मु.पो. सुपा, ता. बारामती, जि. पुणे) सांगीतले. त्याच्या ताब्यातील टेम्पोची पाहणी केली असता, त्यामध्ये भारत गॅस कंपनीचे एकुण 15 सिलेंडर मिळाले, ज्यात ४ सिलेंडर (19 लिटर प्रत्येकी) भरलेले व 11 सिलेंडर रिकामे होते. तसेच सिलेंडर पल्टी करण्यासाठी वापरात असलेल्या 4 नग स्टीलच्या नळ्या, असा एकुण 37,500 रुपये किंमतीचा माल व 2,00,000 रुपये किंमतीचा टेम्पो असा सर्व मिळुण एकुण 2,37,500 रुपये किंमतीचा माल पोलिसांनी  पंचनाम्याने जप्त केला. आरोपीविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीची दोन दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत