नवी दिल्ली : महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत.
8/12
I wish to exhort all state governments, especially the states where reduction wasn’t done during the last round (November 2021), to also implement a similar cut and give relief to the common man.— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022
याशिवाय १२ सिलेंडरवर २०० रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याचं देखील निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. यामुळं केंद्र सरकारला ६ हजार कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारांनी देखील कर कमी करावेत, असं आवाहन सीतारमण यांनी केलं आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनी कर कमी केले नव्हते.




