Agriculture Act will not be repealed - Chandrakant Patil
देश

काहीही झालं तरीही कृषी कायदा रद्द होणार नाही – चंद्रकांत पाटील

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले कि, “शेतकरी आंदोलनाची केंद्राने गंभीर दखल न घेतल्यास हे आंदोलन केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहणार नाही राहणार नाही.” यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं […]

If a senior leader says something, ego should be forgotten and accepted, says Raut
महाराष्ट्र

ज्येष्ठ नेता काही सांगत असेल तर अहंकार विसरून स्वीकारायला हवं, काँग्रेसच्या इशाऱ्यावर राऊत यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानानं महाराष्ट्र काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. “हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. “राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण […]

If this government wants to remain stable .. Congress gave a warning to the leaders of Mahavikasaghadi
महाराष्ट्र राजकारण

हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर.. काँग्रेसने दिला महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल टिपण्णी केली होती. त्यावरून काँग्रेस आता नाराज असल्याचं बोललं जात होतं, त्यातच आता काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी सातत्यानं चर्चेत येताना दिसत असतात. त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात […]

MP Udayanraje Bhosle on Maratha reservation
महाराष्ट्र

मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं, खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेसाठी खास बॅनर बनवण्यात आलं होतं. त्यावर ‘मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’ असं […]

MLA Bharat Bhalke
कोरोना पुणे महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी पंढरपूरच्या सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत […]

Sharad Pawar
महाराष्ट्र राजकारण

या कारणाने शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द होण्यावरुन एकनाथ खडसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. यानिमित्ताने एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. भविष्यात […]

amruta fadanvis slam shiv sena after bihar election result tweet
महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेला ‘शवसेना’ म्हणत शिवसेनेवर बोचरी टीका..

मुंबई : बिहार निवडणुकीमध्ये मात्र शिवसेनेने लढविलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेला ‘शवसेना’ म्हटले आहे. तसंच शिवसेनेने बिहारमध्ये आपल्या साथीदारांना ठार मारल्याचा टोला हाणला आहे. महाराष्ट्र कुठेही नेऊन ठेवला असेल […]

Sharad Pawar revealed about the photo with Naik's family
महाराष्ट्र

अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांसमवेत असलेल्या फोटोविषयी शरद पवार यांनी केला खुलासा

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्वय नाईक प्रकरण चर्चेत आलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे. आता यावर स्वत: शरद पवार यांनी खुलासा केला आहे. त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद […]

2 crore 75 lakhs in the Chief Minister's Assistance Fund from Rayat Shikshan Sanstha
महाराष्ट्र

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 2 कोटी 75 लाख

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी या […]

Eknath Khadse join NCP
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर एकनाथ खडसेंना संधी, खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव : राष्ट्रवादीकडून राज्यपाल नामनिर्देशित आमदार म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. सहकार आणि समाजसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याने राष्ट्रवादीने त्यांची निवड केली आहे. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून माझ्या नावाची शिफारस झाल्याचा मला आनंद आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मी आभार मानतो, असं खडसे […]