Sharad Pawar
महाराष्ट्र राजकारण

या कारणाने शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द….

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द होण्यावरुन एकनाथ खडसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ते २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. यानिमित्ताने एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. भविष्यात खडसे जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक परिसरात भाजपाला मोठे आव्हान निर्माण करू शकत असल्याने सर्वांचंच या दौऱ्याकडे लक्ष लागलं होतं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एकनाथ खडसे म्हटले कि, शरद पवारांच्या दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने परवानगी देण्यास नकार दिला. मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अडचणीचं ठरलं असतं. यामुळेच दौरा रद्द नाही तर स्थगित करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत