If a senior leader says something, ego should be forgotten and accepted, says Raut

ज्येष्ठ नेता काही सांगत असेल तर अहंकार विसरून स्वीकारायला हवं, काँग्रेसच्या इशाऱ्यावर राऊत यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेल्या विधानानं महाराष्ट्र काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. “हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं,” असा इशाराच महाराष्ट्र काँग्रेसकडून देण्यात आला. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“राहुल गांधी हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत, पण ते काँग्रेसचे अध्यक्ष नाहीत. त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि कामाला लागावं या मताचा मी आहे. हैदराबादमध्ये काँग्रेसची कामगिरी चांगली नाही. त्याउलट भाजपा ४ वरून ५०च्या आसपास पोहोचला. हे यश आहे. काँग्रेसने झोकून देऊन काम करायला हवं. निकालाची पर्वा न करता. ते लोकांना जेव्हा दिसेल. तेव्हा लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील,” असं राऊत म्हणाले.

“राहुल गांधी यांच्या बाबतीत अशी विधान वारंवार होत असतात. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचा मी सगळ्यात मोठा समर्थक आहे. सगळ्यांनाच पंडित नेहरू होता येत नाही. सगळ्यांनाच नरेंद्र मोदी होता येणार नाही. सगळ्यांना शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकाच्या नेतृत्वाच्या आपल्या मर्यादा असतात. मोदींच्याही आहेत. अशा वेळेला ज्या सातत्याविषयी शरद पवार बोलत आहेत. मला असं वाटतं की, शरद पवारांची जी भूमिका आहे, शरद पवारांचं सांगणं, हे त्यांच्यापेक्षा अनुभवानं कमी असलेल्या कुणीही फक्त राहुल गांधीच नाही, तर कुणीही मार्गदर्शन म्हणून स्वीकारायला हवं. ते जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा अभ्यास असतो.”

“आम्हीसुद्धा अनेकदा पवारांचं मार्गदर्शन घेतो. मुख्यमंत्री घेतात. शरद पवारांचा दांडगा अनुभव आहे, तर सगळ्यांनी आपला अहंकार विसरून आपल्यापेक्षा ज्येष्ठ नेता आपल्याला काही सांगत असेल, तर आपण त्या भूमिकेत शिरायला पाहिजे. सातत्यानं काही लोक असं बोलत असतील, काँग्रेसनं चिंतन केलं पाहिजे. मी त्यांच्या पक्षाविषयी बोलू शकतो. पण मला असं वाटतं की, काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्यायचं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावेत. त्यांचं प्रतिमाभंजन व्हावं, यासाठी भाजपाकडून कसोशीने प्रयत्न केले जातात. राहुल गांधी कुठेही मेहनतीत कमी पडत नाहीत. त्यांना नशीब आणि भाग्य साथ देत नाही,” असं देखील राऊत यावेळी म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत