2 crore 75 lakhs in the Chief Minister's Assistance Fund from Rayat Shikshan Sanstha
महाराष्ट्र

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 2 कोटी 75 लाख

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९ करिता 2 कोटी 75 लाख 92 हजार 821 रुपयांचा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीचा धनादेश सुपूर्द केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी या निधीसाठी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. उद्धव ठाकरे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदींचे या योगदानासाठी आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुकही केले आहे. कोविड-१९ विषाणूमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अशा रितीने एकत्र होणारा निधी, गरजूंच्या उपचारासाठी मदतीचा हातभार ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत