Hyderabad won by 6 wickets
क्रीडा

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादचा ६ गडी राखून विजय; बंगळुरूचे आव्हान संपुष्टात

अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. […]

Delhi won the match against Bangalore
क्रीडा

दिल्लीने बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली; बंगळुरूलाही प्लेऑफचं तिकीट

IPL 2020 Match 55 DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम आयपीएल २०२० स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाल्या. अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं […]

Bangalore scored 152 for 7 against Delhi
क्रीडा

IPL 2020 : दिल्लीविरूद्ध बंगळुरूच्या ७ बाद १५२ धावा, १३ वर्षात पहिल्यांदा बघायला मिळाली ‘ही’ गोष्ट

दिल्लीविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने २० षटकात ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक केले तर शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने चांगली खेळी केली. एनरिक नॉर्येने ३ बळी घेत बंगळुरूच्या धावगतीला आवर घातला, देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. […]

IPL 2020 DC vs RCB
क्रीडा

IPL 2020 DC vs RCB : दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात मोठे बदल

दिल्ली विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लढत सुरु. दिल्लीने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, दिल्ली आणि बेंगळुरू ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि […]

IPL 2020 : Mumbai vs Delhi, Bengaluru vs Hyderabad
क्रीडा

IPL 2020 डबल हेडर : आज मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३.30 वाजता मैच, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात ७.30 वाजता मैच

आयपीएलच्या आजच्या डबल हेडरमध्ये (एका दिवसात 2 सामने), 4 संघांपैकी दोन संघांना प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुपारी ३.30 वाजता दुबई येथे सामना रंगेल. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शारजाह येथे सायंकाळी ७.30 वाजता सामना होईल. […]

Ipl 2020 Suryakumar Yadav
क्रीडा

मी आहे ना ! मैदानातील ‘त्या’ राड्यानंतर सूर्यकुमारने हार्दिकला केलं शांत

मुंबई : हार्दिक पांड्यासोबत भागीदारी करताना सूर्यकुमारने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. हार्दिक पांड्यानेही त्याला उत्तम साथ देत मॉरिसच्या गोलंदाजीवर सुंदर षटकार खेचला. हा फटका खेळल्यानंतर हार्दिकने मॉरिसला काहीतरी बोलून डिवचण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मॉरिसने हार्दिकला बाद करत आपला बदला घेतला. यावेळी माघारी परतत असताना हार्दिक आणि RCB च्या खेळाडूंमध्ये मैदानावर चांगलीच जुंपलेली […]

Suryakumar strong innings from Mumbai
क्रीडा

IPL 2020 : मुंबईकडून सूर्यकुमारची दमदार इनिंग! बंगळुरूचा पराभव

IPL 2020 RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेली मॅच मध्ये सूर्यकुमार यादवने केलेल्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर मुंबईच्या संघाने बंगळुरूवर ५ गडी राखून विजय मिळवला. बंगळुरूने दिलेलं आव्हान मुंबई इंडियन्सने 19.1 ओव्हर्समध्ये पाच विकेट्स गमावत गाठलं. या विजयासह मुंबईने १६ गुणांसह तालिकेत अव्वलस्थान पटकावले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत प्रथम बॉलिंग […]

Mumbai vs Bangalore
क्रीडा

IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना

आयपीएलचा 48 वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबू धाबी येथे रंगणार आहे. दोन्ही संघ 14-14 गुणांसह टॉप-2 मध्ये आहेत. अशा परिस्थितीत आजचा एक विजय त्यांचे प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करू शकेल. मागच्या वेळी दोन्ही संघात सामना झाला तेव्हा सुपर ओव्हर खेळावी लागली होती. दुबईत खेळल्या गेलेल्या दहाव्या सामन्यात बंगळुरूने प्रथम […]

Bangalore beat Kolkata
क्रीडा

IPL 2020 : बंगळुरूचा कोलकातावर ८ गडी राखून विजय

IPL 2020 : टॉस जिंकून मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या कोलकाताच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये अवघे 84 रन्स करता आले. बंगळुरूने ही मॅच अगदी सहज जिंकली. कोलकाताने दिलेलं आव्हान बंगळुरूच्या टीमने 8 विकेट्स राखून 13.3 ओव्हर्समध्ये गाठलं आणि विजय मिळवला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत KKR ची दाणादाण उडवली. ८५ धावांच्या […]

Royal Challengers Bangalore
क्रीडा

RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ विकेट राखून विजय

IPL 2020 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स विरुद्धची मॅच ७ विकेट राखून जिंकली. राजस्थान रॉयल्सने दिलेले १७८ धावांचे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ विकेट गमावून १९.४ ओव्हरमध्ये पूर्ण केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डीविलिअर्सने २२ चेंडूत एक चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या. सलामीवीरी देवदत्त पडिक्कलने ३५ आणि अॅरॉन फिंचने १४ […]