काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. “गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे […]
टॅग: congress
काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल अतिदक्षता विभागात (ICU); प्रकृती चिंताजनक
नवी दिल्ली : काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल यांची प्रकृती खालावली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोव्हिड संसर्गानंतर पटेल यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु आहेत अहमद पटेल यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती पटेल यांनी एक ऑक्टोबरला ट्विटरवरुन दिली होती. तेव्हापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार […]
भाजपला धक्का : भाजपचे माजी जिल्हाध्यक्षाचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई : भाजपचे ठाण्याचे माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चोरगे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरुण नेते रणजित देशमुख यांनी देखील काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. सातारा आणि ठाण्यातील भाजप नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर राज्यभरातील आणखी बरेच नेते आपल्या संपर्कात असल्याचं बाळासाहेब थोरात […]
बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..
पाटणा : बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, बहुमतहि मिळाले. यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झाले. राज्यात ७५ जागा जिंकून आरजेडी हा पहिल्या क्रमांकाचा तर ७४ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. एनडीएने १२५ आणि महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला. तसेच बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात […]
जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले.. काँग्रेसला मतदान करण्याचं केलं आवाहन
मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसमधून भाजपच्या गोटात प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. मात्र, एका जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले… आणि त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली. शनिवारी डबरामध्ये भाजप उमेदवार […]
अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसच्या महापालिकांना उद्धव ठाकरेंकडून निधी मिळत नाही..
मुंबई : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नांदेडलाही निधी मिळाला नाही, मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला असं त्यांनी सांगितलं आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण परभणीत पोहोचले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक […]
पाकिस्तानी मंत्र्याच्या वक्तव्यानंतर काँग्रेस गप्प का? – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
भारतात झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे हे आम्ही आधीपासून सांगत आलो आहोत. आता पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या एका मंत्र्यांनं केलेल्या वक्तव्यावरुन आमचा दावा खरा ठरला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. पुलवामा दहशतवादी हल्यावेळी काँग्रेसने या हल्ल्याबाबत संशय उपस्थित केला होता आणि पंतप्रधानांवरही काही आरोप केले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपलाच […]
ब्रेकींग : काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु होणार, मुंबईकरांना मोठा दिलासा
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असणाऱ्या लोकल लवकरच सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे, आता सध्या लोकल मधून प्रवास करण्यासाठी महिला, वकील आणि खासगी सुरक्षा रक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. एका प्रवाशाने ट्विट करत, “याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि […]
पंजाबमध्ये सहा वर्षाच्या बालिकेला बलात्कारानंतर जाळण्याच्या घटनेवर कॉंग्रेस शांत का?- निर्मला सीतारमण
पंजाबमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या शांततेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील बलात्काराच्या घटनेबद्दल राज्य सरकारला घेरणाऱ्या कॉंग्रेसला भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर केलेल्या अमानुषतेचा निषेध केला आणि […]
देशातील गोदामात अतिरिक्त धान्य, मग बालकांचा उपासमारीने मृत्यू का? -राहुल गांधी
जागतिक उपासमारी निर्देशांकाच्या यादीत भारत 94 क्रमांकावर आला आहे. यावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बालकांचा उपासमारीने मृत्यू होत आहे. देशातील धान्यांची गोदामं भरलेली असताना केंद्र सरकार असे का घडू देत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “मोदींनी बनवलेल्या आपत्तींमुळे भारत देशाला सातत्याने […]










