Jyotiraditya Scindia
राजकारण

जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले.. काँग्रेसला मतदान करण्याचं केलं आवाहन

मध्य प्रदेश विधानसभेच्या २८ जागांवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसमधून भाजपच्या गोटात प्रवेश केलेले ज्योतिरादित्य सिंधिया हेदेखील आपल्या पक्षासाठी जोर लावत मैदानात उतरलेले आहेत. मात्र, एका जनसभेत ज्योतिरादित्य सिंधिया आपला पक्षच विसरले… आणि त्यांनी चक्क काँग्रेससाठीच जनतेकडे मतांची याचना केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शनिवारी डबरामध्ये भाजप उमेदवार इमरती देवी यांच्या समर्थनासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही या सभेला हजेरी लावली. याच दरम्यान हा प्रसंग घडला. ‘३ तारखेला पंजाचे बटण दाबले जाईल’ असं म्हणताना ज्योतिरादित्य सिंधिया या व्हिडिओत दिसत आहेत.

‘हात उंचावून शिवराज सिंह आणि आम्हाला हा विश्वास द्या, माझी डबराची जनता, माझी शानदार आणि जानदार डबराची जनता… ३ तारखेला हाताचा पंजा असलेलं बटण दाबेल’… असं म्हणत असतानाच ज्योतिरादित्य सिंधिया यांना आपल्या मोठ्या चुकीची जाणीव झाली. मग लगेचच त्यांनी ‘कमळाचे फूल असलेलं बटन दाबणार आणि हाताचा पंजाच्या बटणाला बोरिया बिस्तर बांधून आम्ही इथून रवाना करणार’ असं म्हणत त्यांनी यु-टर्न घेतला.

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसनंही त्यांचा हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.

.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत