राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली. अमळनेरवरून जळगावकडे येत असताना धरणगाव जवळ अचानक गाडीचे टायर फुटले. गाडीचा वेग कमी असल्यानं व चालकाने प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या गाडीत एकनाथ खडसे यांच्यासह काही कार्यकर्तेही होते. सगळे जण सुखरूप आहेत. सुदैवानं यात एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप आहेत. त्याचबरोबर कुणालाही दुखापत झालेली नाही. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली.
आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 1, 2020