कर्नाटक : प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहातानाची दृृष्य कॅमेरात कैद झाली आहे. सभागृहामधील कॅमेरामनने कामकाजादरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये राठोड अश्लील व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. यासंर्भात राठोड यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिलं. मी इंटरनेटवर काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत होतो, […]
टॅग: congress
ब्रेकिंग : अमित शहा यांना त्वरित गृहमंत्रीपदावरून काढून टाकावे, काँग्रेसची मागणी
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून बुधवारी कॉंग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. कॉंग्रेसने म्हटले आहे की हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे आणि अमित शहा यांना त्वरित गृहमंत्रीपदावरून काढून टाकले पाहिजे. गृहमंत्री उपद्रव करणाऱ्यांचा शोध घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. कॉंग्रेसचे नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर म्हटले की ते […]
राष्ट्रवादीला धक्का, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेसमध्ये प्रवेश
सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (28 जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. मोहिते पाटील अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत. डॉ धवलसिंह यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपसह असलेल्या […]
केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ : प्रकाश आंबेडकर
अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केंद्राच्या सध्याच्या […]
मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मंजुरी दिली आहे. शनिवारी रात्री अखिल भारतीय कमिटीनं हे जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरत होता. याआधी लोकसभा निवडणुकींच्या […]
राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले – बाळासाहेब थोरात
शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले, असं मत त्यांनी व्यक्त केलं. “राहुल गांधी […]
हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर.. काँग्रेसने दिला महाविकासआघाडीतील नेत्यांना इशारा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल टिपण्णी केली होती. त्यावरून काँग्रेस आता नाराज असल्याचं बोललं जात होतं, त्यातच आता काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी सातत्यानं चर्चेत येताना दिसत असतात. त्यातच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीविषयी करण्यात […]
विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण आहे आघाडीवर
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर पदवीधर […]
मुख्यमंत्र्यांची भाषा नाक्यावर होणाऱ्या भांडणांसारखी, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना खास मुलाखत दिली. या मुलाखतीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, अशी टीका फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केली. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर तसंच मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका केली. “महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये बुधवारी (25 नोव्हेंबर) पहाटे 3.30 वाजता निधन झालं आहे. महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे आरोग्य अधिकच ढासळले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. फैजल पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे […]










