कर्नाटक : प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहातानाची दृृष्य कॅमेरात कैद झाली आहे. सभागृहामधील कॅमेरामनने कामकाजादरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये राठोड अश्लील व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. यासंर्भात राठोड यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिलं. मी इंटरनेटवर काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत होतो, असं राठोड म्हणाले आहेत.
मी सामान्यपणे सभागृहामध्ये मोबाईल घेऊन जात नाही. मात्र या सत्रामध्ये मला काही प्रश्न विचारायचे होते. याच कारणासाठी मीबाईल घेऊन आलो होते. त्याचसंदर्भात मी मोबाईल चेक करुन लागलो. त्यावेळी माझ्या मोबाईलची मेमरी फूल झाल्याचं दिसलं. त्यानंतर मी मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप डिलीट करु लगालो, असं राठोड सांगतात.
राठोड यांच्या फोटोसंदर्भात बोलताना भाजपाच्या प्रवक्त्यांनी राठोड यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केलीय. हे वरिष्ठ सभागृह आहे. विद्वान लोकं येथे येतात मात्र ते आज चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. मागच्या वेळेस काँग्रेसने मोठा गदारोळ माजवला होता. आज त्यांच्या पक्षाचा सदस्यच असे व्हिडीओ बघतानाचा फोटो समोर आलाय. अपेक्षा आहे की राठोड यांच्याविरोधात डी. के. शिवकुमार कठोर कारवाई करतील आणि त्यांना पक्षातून काढून टाकतील, असं भाजपाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरुन आता कर्नाटकमधील राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.




