मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर महाविकास आघाडी सरकारने सुद्धा पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, राज्यात या सरकारने अघोषित आणीबाणी लावली आहे. देवेंद्र […]
टॅग: BJP
भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण
भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की […]
ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर… देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला इशारा
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला. आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा इशारा देतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही […]
जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक
पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे पी नड्डा कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी चालले होते. कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही दगडफेक करण्यात आली. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास […]
काँग्रेसशी हातमिळवणी करायला नको होती – माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी
बेंगलुरू : जनता दल सेक्युलर नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावर षडयंत्र केल्याचा आरोप करत म्हटले की त्यांचा इतका मोठा विश्वासघात भाजपानेही केला नव्हता. पुढे ते म्हणाले की ते जाळ्यात अडकले होते. काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांच्या पक्षाने राज्यातील जनतेचा १२ वर्षांचा विश्वास गमावला. कुमारस्वामी म्हैसूर इथे बोलताना म्हणाले कि, ‘मी भाजपबरोबर चांगले […]
मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला – नितेश राणे
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला. शिवसेनेच्या हाती काहीच लागले नाही, असं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत जोरदार टीका केली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, “ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला […]
विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण आहे आघाडीवर
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर पदवीधर […]
बॉलिवूड मुंबईतच राहिल, आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही – योगी आदित्यनाथ
आम्ही काहीच घेऊन जायला आलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी तयार करण्यासाठी आलो आहोत, असं म्हणत बॉलिवूड मुंबईतच राहिल, अशी ग्वाही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चेवरून जोरदार राजकारण रंगलं होतं. कुणीच कुणाची गोष्ट घेऊन जात नाही. ही काय पर्स आहे […]
राहुल गांधी बँकॉकमध्ये जाऊन नक्की कोणत्या शेतीचा अभ्यास करत आहेत?
मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सलग सातव्या दिवशी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरु असून दिल्लीत शेतकरी मोदीसरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी या कायद्यांना विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. मंगळवारी सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, पीयूष गोयल आणि सोम प्रकाश यांनी शेतकरी नेत्यांशी बैठकीत संवाद साधला. पण […]
उर्मिला मातोंडकर आणि शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर माझ्या शुभेच्छा – प्रितम मुंडे
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकरच्या शिवेसना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी टोला लगावला आहे. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. “माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचं आणि […]










