भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत यासंदर्भातली माहिती दिली आहे.
ते म्हणाले कि, कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने मी कोरोनाची चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे मी पालन करतो आहे. माझं हे आवाहन आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है, डॉक्टर्स की सलाह पर होम आइसोलेशन में सभी दिशा- निर्देशो का पालन कर रहा हूँ। मेरा अनुरोध है, जो भी लोग गत कुछ दिनों में संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 13, 2020