अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान उर्मिला मातोंडकरच्या शिवेसना प्रवेशावरुन भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी टोला लगावला आहे. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा असं त्या म्हणाल्या आहेत. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
“माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला काँग्रेस पक्षाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिलं. शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचं आणि शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहे,” असा टोला प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे.
“कोणत्याच पातळीवर सरकार चांगलं काम करताना दिसत नाही. त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही,” असंदेखील त्या यावेळी म्हणाल्या.
महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरत आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली नाही,महिला सुरक्षेचा विषय दिवसेंदिवस गंभीर होतो आहे.कोरोनाच्या संकटात उपाययोजना करण्याच्या बाबतीत देखील सरकार निष्क्रिय ठरले आहे. ( 2/2 )
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) November 30, 2020