अभिनेत्री कंगना रानौत कायमच समाजात घडलेल्या कोणत्याही घटनेवर उघडपणे मत व्यक्त करते. सध्या जेएनयूची माजी विद्यार्थीनी नेता असणाऱ्या शेहला रशीद यांच्यावर त्यांच्याच वडिलांनी गंभीर आरोप केले आहेत. कंगनाने ट्विट करत या प्रकरणाविषयी तिचं मत मांडलं आहे.
“देशद्रोह केल्यावर तुम्हाला संपत्ती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, साथी सगळं काही मिळेल. पण जर तुम्ही देशप्रेमी असाल तर तुमच्या वाट्याला शत्रू, संघर्ष,पूर्वजांच्या सभ्यतेचा संघर्ष तुम्हाला वारसाहक्काने मिळेल. तुमचं आयुष्य आहे तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचा आहे, समजूतदारपणे आयुष्य जगायचं की मुर्खासारखं?. मी तर जन्मत:चं मुर्ख आहे”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.
देशद्रोह से आपको पैसा, अंतरष्ट्रिया पुरस्कार, मित्र, सहयोग सब कुछ मिलेगा, मगर देशप्रेम से आपको दुश्मन मिलेंगे,संघर्ष मिलेगा, पूर्वजों की सभ्यता की लड़ाई विरासत में मिलेगी,आपकी ज़िंदगी है आपका निर्णय होना चाहिए,समझदारी की ज़िंदगी जीनी है या मूर्खता की?
मैं तो पैदाइशी मूर्ख हूँ ? https://t.co/Ey1RpPZQjC— Kangana Ranaut (@KanganaTeam) December 1, 2020