Former Chief Minister kumarswami regrets joining hands with congress

काँग्रेसशी हातमिळवणी करायला नको होती – माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी

राजकारण

बेंगलुरू : जनता दल सेक्युलर नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्यावर षडयंत्र केल्याचा आरोप करत म्हटले की त्यांचा इतका मोठा विश्वासघात भाजपानेही केला नव्हता. पुढे ते म्हणाले की ते जाळ्यात अडकले होते. काँग्रेसशी हातमिळवणी करून त्यांच्या पक्षाने राज्यातील जनतेचा १२ वर्षांचा विश्वास गमावला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कुमारस्वामी म्हैसूर इथे बोलताना म्हणाले कि, ‘मी भाजपबरोबर चांगले संबंध ठेवले असते तर मी अजूनही मुख्यमंत्री असतो. मी २००६-०७मध्ये राज्यातील जनतेचा विश्वास जिंकला होता आणि तो १२ वर्षे कायम ठेवला होता, पण काँग्रेसशी हातमिळवणी करून मी तो गमावला.’ ते म्हणाले की त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करायला नको होती, ज्यांनी जनता दल सेक्युलरला भाजपाची बी टीम म्हणत प्रचार केला होता. पण पक्षाचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा यांच्या दबावामुळे ते ही आघाडी करण्यास तयार झाले. पुढे ते म्हणाले, ‘माझ्या पक्षाला ताकद गमावून याची किंमत द्यावी लागली. कुमारस्वामी यांनी स्पष्टीकरण दिलं की, ते देवेगौडा यांना दोष देत नाहीत, कारण ते धर्मनिरपेक्षतेची ओळख असलेल्या आपल्या वडिलांचा सन्मान करतात.

२०१८मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर राजकीय समीकरण बदलत एकमेकांविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले होते. सत्तास्थापनेनंतर कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी एकत्र लोकसभा निवडणूक लढवली त्यानंतर युतीत मतभेद निर्माण झाले आणि काही आमदारांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत