राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला. शिवसेनेच्या हाती काहीच लागले नाही, असं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, “ठीक आहे आम्ही कमी पडलो. पण मुख्यमंत्री असलेल्या पक्षाला भोपळा मिळाला आहे. मित्रपक्षांनीच शिवसेनेच्या मृत्यूचा सापळा रचला आहे. बाकी मैदानात परत भेटूच.”
ठीक आहे आम्ही कमी पडलो!
पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा..
मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा..
बाकी मैदानात परत भेटूच !!— nitesh rane (@NiteshNRane) December 4, 2020
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून केवळ अमरावतीत एकमेव जागेवर उमेदवार उभा करण्यात आला होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नातेवाईक असलेल्या आणि अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या किरण सरनाईक यांच्याकडून श्रीकांत देशपांडे यांना पराभव स्वीकारावा लागला. तर उर्वरित जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हे सर्व उमेदवार निवडून आले असले तरी शिवसेनेला मात्र एकही जागा मिळाली नाही.