शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या सर्व बसचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या ‘फेम II’ उपक्रमांतर्गत (फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिक वेहिकल्स) इलेक्ट्रिक बस योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत ‘फेम’कडून ३४० बस मंजूर झाल्या आहेत. यापैकी आज 26 बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. आजपासून त्या प्रवाशांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत आजपासून सुरु झाल्या ही आनंदाची बाब आहे. मुंबईत सद्यस्थितीला 46 बस सुरु असून एकूण 340 बस उपलब्ध होणार आहेत. शाश्वत आणि वातावरणातील बदलासाठी असे उपक्रम राबविले पाहिजेत. तसेच मुंबईकरांचा प्रवास कसा सुखकर होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे. या लोकार्पण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बसची पाहणी केली. त्यानंतर जनतेसाठी सोयीची आणि सुखकारक ठरेल याची खात्री करण्यासाठी स्वत: या नवीन इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास केला.
CM Uddhav Thackeray ji launched 26 electric buses today, the first lot of a total 340 electric buses of the @myBESTBus for Mumbai.
These are obtained through the FAME 2 policy of centre, for which we had initiated process in 2018 (1/n) pic.twitter.com/3aRD7Byomq— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 4, 2020