Shocking: member of a family brutally murdered

OYO रुममध्ये तरुणीची निर्घृण हत्या; मृत तरुणीच्या मित्राला अटक

क्राईम देश

केरळ : कोचीमधील ओयो रूममध्ये एका २२ वर्षीय तरुणीची चाकूने वार करत हत्या करण्यात आली. बुधवारी रात्री 10.45 च्या सुमारास ही हत्या झाली असून मृत महिलेचे नाव रेश्मा आहे. ती लॅब अटेंडंट असून मूळची चांगनासेरी येथील आहे. याप्रकरणात तरुणीच्या मित्राला अटक करण्यात आली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणात तरुणीचा मित्र नौशीद याला अटक करण्यात आली आहे. नौशीद हा मूळचा बलुसेरी येथील असून त्याला ताब्यात घेण्यात आले. तो कलूर येथील ओयो हॉटेलमध्ये केअर टेकर म्हणून काम करत होता. “नौशीद आणि रेश्मा यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली. नौशीदचा फोन आल्यावर त्याला भेटण्यासाठी रेश्मा हॉटेलच्या रुममध्ये गेली होती. हॉटेलच्या रूममध्ये त्यांच्यात वाद झाला आणि नंतर नौशीदने रेश्माच्या मानेवर चाकूने वार केले. तिच्या मानेवर खोलवर जखमा झाल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले, त्यांनी रेश्माला रुग्णालयात नेले; पण तिचा जीव वाचवू शकलो नाही. नौशीदही तिथेच होता. पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि त्यांनी नौशीदची चौकशी केली. त्यानंतर नौशीदनेच तरुणीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. एर्नाकुलम उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी पुढे सांगितले की, रेश्माचा मृतदेह खासगी रुग्णालयातून एर्नाकुलम सामान्य रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. पोस्टमॉर्टम प्रक्रियेनंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल. दरम्यान, आरोपीला एर्नाकुलम दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हत्येमागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेवर OYO ने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत