भाजपाचे स्टार कॅम्पेनर मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग केली गेली. त्यांच्या हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.
मनोज तिवारी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पटना विमानतळावरून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाड झाला. हेलिकॉप्टर सुमारे 40 मिनिटे हवेत उडत राहिले. याआधी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हेलिकॉप्टर पटना विमानतळावर उतरताना अपघात होता होता वाचले होते.