Pune: One dead After Multiple Vehicles Collide With Each Other In Kondhwa
पुणे महाराष्ट्र

पुणे : कोंढव्यात अनेक वाहनांचा विचित्र अपघात, एकाचा मृत्यू

पुणे : कोंढवा येथील खडी मशीन चौकाजवळ भीषण अपघात झाला. अनेक वाहनांची धडक होऊन झालेल्या या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला, तर पाच जण जखमी झाले आहेत. प्रशांत कृष्णा चौरे (४३, रा. धनकवडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कात्रज-कोंढवा बायपास रोडवर ही घटना घडली. एका वाहनाच्या चालकाने अचानक गाडी थांबवल्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना गाडीवर नियंत्रण मिळवण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे मागून येणाऱ्या सिमेंटचे पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

या घटनेमुळे पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत