Police
महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाची मंजुरी

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिलेली आहे. थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. गृह विभागाकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त असूनही ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच गडचिरोलीचा दौरा केला, तेव्हा पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या काही तरुण-तरुणींनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. तसे शासन आदेश देखील जारी करण्यात आले आहेत.

आदेशानुसार, १५० पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक आणि १०५ सशस्त्र पोलीसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे ही पदे तातडीने भरण्याची गरज लक्षात घेऊन ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यात पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त ३११ पदे म्हणजे ( १५० पोलीस शिपाई आणि १६१ पोलीस शिपाई चालक) आणि समदेशक तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३, देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली १०५ अशी ४१६ पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग ( माहिती व तंत्रज्ञान) शासन निर्णय क्रमांक ३ यातून वगळून ही पदे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत न राबवता थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. मात्र ही प्रक्रिया फक्त यावेळी करण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी अनुज्ञेय राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत