Four arrested for Kidnapping for ransom

पुणे : 15 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी अपहरण, आरोपींना पोलिसांनी काही तासांतच ठोकल्या बेड्या

पुणे महाराष्ट्र

पुणे : अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा तासात सुटका केली. 20 लाखांच्या खंडणीसाठी या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरीचा स्टॉल चालवणाऱ्या मुलाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, हिंजवडी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी रात्री मुलगा घरी परतला नाही. नंतर मुलाच्या वडिलांना 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा फोन आला. हिंजवडी फेज २ येथील स्वराज पेट्रोल पंपाजवळून रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याचे अपहरण करण्यात आले. त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.

हे कुटुंब मूळ उत्तर प्रदेशातील आहे. मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी शिक्रापूरजवळ आरोपींचा माग काढला. ते अहमदनगरच्या दिशेने जात होते, मात्र त्यांची गाडी बिघडल्याने त्यांनी ती दुरुस्तीसाठी दिली होती. त्यांना अटक करून मुलाची सुटका करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन धारदार शस्त्रे, पाच मोबाईल फोन तसेच कार जप्त केली आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वर किसन चव्हाण (23), लखन किसन चव्हाण (26) आणि लक्ष्मण डोंगरे (22) अशी अटक केलेल्यांची ओळख पटवली असून अपहरणप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. आरोपी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील असून ते हिंजवडी परिसरात राहतात.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी तक्रारदार महिलेच्या स्टॉलवर फुकट खात असे. त्यांनी तिने पैसे मागितल्यावर तिच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी देखील दिली होती. मात्र, तिने यापूर्वी त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत