Shocking: Police constable's daughter abducted and raped
पुणे महाराष्ट्र

धक्कादायक : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

पुणे : पोलीस शिपायाच्या मुलीचे अपहरण करून तीन जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचं २१ डिसेंबरला रात्री ८ वाजता वडगाव शेरी परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर नेवासा परिसरात नेऊन बलात्कार करण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका पोलीस शिपायाची मुलगी आहे. तिची परिसरातील सागर नावाच्या तरुणाशी मैत्री होती. २१ डिसेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास तरुणी रस्त्याने जात असताना सागर दोन साथीदारांसह तिथे आला. त्याने तरुणीला अडवले आणि मी तुझ्यासोबत लग्न करतो, तू माझ्या गाडीत बस. तू गाडीत बसली नाही, तर मी जिवाचे बरेवाईट करून घेईन, असं म्हणाला. त्यानंतर त्याने विषाची बाटली तरुणीला दाखवली.

घाबरून तरुणी त्यांच्या गाडीत बसली. त्यानंतर तिघांनी तरुणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं व तिचे हातपाय बांधून नेवासा परिसरात घेऊन गेले. तिथे तरुणीवर बलात्कार केला आणि तिला परत पुण्यामध्ये आणून सोडलं. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सागर मोहन सातव (वय २८) याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपस करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत