japans doctors association ask government to cancel tokyo olympics

टोकिओ ऑलिंपिक सुरु होण्यास फक्त १० आठवडे, डॉक्टरांच्या असोसिएशनने केली ‘ही’ विनंती

ग्लोबल

टोकिओ : ऑलिंपिकला सुरुवात होण्यास फक्त १० आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील नागरिकांनी ऑलिंपिक आयोजनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच आता जपानमधील डॉक्टरांच्या एका मोठ्या असोसिएशनने ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. याआधी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील कोरोना संसर्गामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जपानची राजधानी टोकिओमध्ये काम करणाऱ्या ६ हजार डॉक्टरांच्या असोसिएशनने म्हटले आहे की, आपण कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत आहोत. त्यांच्या मते ही आतापर्यंतची सर्वात मोठी लाट आहे. डॉक्टरांच्या या संघटनेने इशारा दिला की, अशा प्रकारच्या आयोजनामुळे कोरोनाचे संक्रमण आणि मृतांचा आकडा वाढू शकतो. त्यामुळे स्पर्धा रद्द करणे हाच योग्य मार्ग असेल. डॉक्टरांच्या असोसिएशनने सरकार आणि ऑलिंपिक समितीली विनंती केली आहे की त्यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीशी चर्चा करून ही स्पर्धा रद्द करण्याबाबत विचार करावा.

काही दिवसांपूर्वी जपानमधील एका दैनिकाने घेतलेल्या सर्व्हे मध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी ऑलिंपिकच्या आयोजनाला विरोध केला होता. पण ऑलिंपिक समितीच्या अधिकाऱ्यांनी कोरोना संदर्भात योग्य ती उपाय योजना करून स्पर्धेचे आयोजन करता येऊ शकते, असे म्हटले. त्यांना अशी आशा आहे की काही विदेशी खेळाडूंसह मोजक्या स्पर्धांचे आयोजन होऊ शकेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत